मुंबई : महिला व लघुउद्योजकांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्याच्या उद्देशाने आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या मीनल मोहाडीकर यांच्या संकल्पनेतून दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील वनिता समाज सभागृहात भव्य ग्राहक पेठचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवार, २६ सप्टेंबर रोजी निर्मात्या अमृता राव यांच्या हस्ते पार पडले.
या भव्य ग्राहक पेठला २८ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत भेट देता येणार आहे. या ग्राहक पेठेत साड्या, दागिने, बॅग्ज, पर्सेस, गाऊन्स, पंजाबी ड्रेस, चादरी, पापड, ड्रायफ्रुट्स, रांगोळी, पैठणी साड्या, सौंदर्य प्रसाधने, मॉप, साबण, भेटवस्तू आदी गृहोपयोगी वस्तू मिळणार आहेत. ग्राहकांनी खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहन संयोजिका मीनल मोहाडीकर यांनी केले आहे.