मुंबई: तिकीट खिडक्यांसमोर रांगेत उभे राहून तिकीट अथवा पास काढण्यासाठी वेळ खर्च करण्यापेक्षा काही प्रवासी पेपरलेस मोबाइल ॲप तिकीट (यूटीएस) सेवेला पंसती देतात. या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढावा यासाठी तिकिटासाठी घातलेली कमी अंतराची अट शिथिल करण्याचा निर्णय सेंटर फाॅर रेल्वे इन्फाॅर्मेशन सिस्टिम (क्रिस), तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापुढे उपनगरीय रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत तिकीट काढणे शक्य होणार आहे. सध्या स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावरील स्थानकाचे तिकीट काढता येत होते. मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे स्थानकापासून पाच किलोमीटरऐवजी आता २० किलोमीटर अंतरा – पर्यंत तिकीट काढता येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. सध्या यूटीएस मोबाइल ॲपवरून केवळ सात ते आठ टक्के तिकीट विक्री होत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distance condition of mobile app ticket will be relaxed decision by central and western railway mumbai print news tmb 01