मुंबई : टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट, गणपतीची आरती, येऊन येऊन येणार कोण, अशा जल्लोषाच्या वातावरणात रंगणारी ‘आयएनटी’ एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मंगळवारी २० सप्टेंबरला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे.
यंदाचे ‘आयएनटी’ एकांकिका स्पर्धेचे हे ४७ वे वर्ष आहे. यंदा ‘आयएनटी’च्या या स्पर्धेत एकूण १८ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यांपैकी पाच महाविद्यालयांच्या एकांकिका अंतिम स्पर्धेत पोहोचल्या आहेत. साठे महाविद्यालयाची ‘तस्मै श्री गुरवे नम:’, खालसा महाविद्यालयाची ‘काहीतरी अडकतयं’, किर्ती महाविद्यालयाची ‘उकळी’, रुईया महाविद्यालयाची ‘अरे ला कारे’ आणि एम.डी महाविद्यालयाची ‘बारम’, या पाच एकांकिका अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. राजीव जोशी आणि मुग्धा गोडबोले हे ‘आयएनटी’च्या प्राथमिक फेरीच्या परिक्षणाची धुरा सांभाळली होती.