मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये बेस्ट उपक्रमातील बसगाडीला आग लागण्याच्या घटना घडत आहे. मार्वे बस स्थानकात शुक्रवारी सकाळी उभ्या असलेल्या बसच्या इंजिनाच्या बाजूला वायू गळती होऊन अचानक आग लागली. या आगीत बसची इंजिनची बाजू जळून खाक झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामकांनी बसला लागलेली आग विझवली. त्यानंतर बस मालाड आगारातील नेण्यात आली, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.