मुंबई: मंगळवारी संध्याकाळी मुंबईत पडलेल्या जोरदार पावसाने पश्चिम उपनगराला झोडपून काढले. अंधेरी जोगेश्वरी परिसरात एका तासात ६० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अंधेरी भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे भुयारी मार्ग वाहतूक पोलिसांनी बंद केला. त्यामुळे अंधेरी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

थोडासा पाऊस पडला की अंधेरी सबवे मध्ये पाणी साचते. त्यानुसार वळवाच्या पावसातच हा सबवे पाण्याखाली गेला आहे. पावसाळ्यात अंधेरी सबवेमध्ये पाणी साचू नये म्हणून पालिकेने हाती घेतलेली कामे रखडल्यामुळे या पावसाळ्यातही अंधेरी सबवे वारंवार बंद करावा लागणार आहे.

२० मे २०२५ रोजी सायंकाळी ७ ते ८ या एक तासाच्या कालावधीत मुंबईच्या विविध भागांमध्ये झालेल्या पावसाची माहिती

संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत पडलेला पाऊस

जोगेश्वरी – ६३ मिमी (सर्वाधिक)

मालपा डोंगरी महापालिका शाळा – ५७ मिमी

मरोळ अग्निशमन केंद्र – २९ मिमी

जुहू – २४ मिमी

सांताक्रूझ – २३ मिमी

विलेपार्ले अग्निशमन केंद्र – २१ मिमी

खार दांडा – १९ मिमी

दिंडोशी – १८ मिमी

पूर्व उपनगर

पवई – ३८ मिमी

भांडूप – २९ मिमी

विक्रोळी – १८ मिमी

मुलुंड मिठागर महापालिका शाळा – १८ मिमी