मुंबई : राज्यात ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेची अंमलबजावणी २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येत असून याअंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एक नियमित स्वरूपाचा गणवेश तर स्काऊट व गाईड या विषयासाठी दुसरा गणवेश असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील ४४ लाख ६० हजार ००४ विद्यार्थ्यांना हे गणवेश मिळणार आहेत. दरम्यान गणवेशाच्या शिलाईचे काम जोमाने सुरू असून विद्यार्थ्याना लवकरात लवकर गणवेश उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. गणवेशासाठी प्रती गणवेश ३०० रुपये आर्थिक तरतूद उपलब्ध असून यामध्ये १९० रुपये कापड खरेदीकरिता तर ११० रुपये शिलाई, अनुषंगिक खरेदी आणि वाहतुकीकरिता निश्चित करण्यात आले आहेत.

हेही वाचा : मुंबई : गोवंडीत बनावट नोटांसह एकाला अटक

महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गणवेशाच्या शिलाईचे काम सुरू असून ते लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra one uniform for school students to be implemented soon mumbai print news css