मुंबई : कांदिवली येथील १३ वर्षांच्या मुलावर धार्मिक शिक्षण संस्थेत लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार पीडित मुलावर दोनवेळा अत्याचार झाला आहे. याप्रकरणी १५ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दुसऱ्या अत्याचाराच्या घटनेमध्ये कोणाचा सहभाग होता, याबाबत अद्याप माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : मुंबई : पाच वर्षांत पालिकेने २३६० कोटींची मुदतठेव मोडली, माहिती अधिकारातून बाब उघड

पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून याप्रकरणी पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार पीडित मुलगा एका धार्मिक शिक्षण संस्थेत शिकत होता. त्याच्याबरोबर शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय मुलाने यावर्षी २६ मे रोजी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी पीडित मुलाची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. याशिवाय तक्रारीनुसार, पीडित मुलावर २१ ऑगस्टलाही लैंगिक अत्याचार झाला होता. पण तो कोणी केला, याबाबत माहिती नसल्यामुळे अनोळखी व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलाचा जबाब अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या घटनेत कोणाचा सहभाग होता, हे अद्याप स्पष्ट नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai 15 year old boy sexually assaulted a minor in a religious education institution mumbai print news css