मंकी हिल ते कर्जत मार्गाच्या दुरुस्तीचे काम लांबले; प्रगती एक्स्प्रेससह अनेक गाडय़ा रद्द
लोणावळ्याजवळील कर्जत ते मंकी हिल परिसरात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई ते पुणे रेल्वे मार्गाचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळेच मध्य रेल्वेने पुन्हा एकदा कर्जत ते मंकी हिलदरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामाला महिना लागणार आहे. या कामामुळे एकूण २२ लांब पल्ल्यांच्या गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून, मुंबई ते पुणे मार्गावरील प्रगती एक्स्प्रेससह अनेक गाडय़ा रद्द, तर काही गाडय़ा अन्यत्र वळविण्यात आल्या आहेत.
बहुतांशी अप मार्गावरील गाडय़ा या पुण्यापर्यंतच चालवण्यात येतील. तसेच डाऊन मार्गावरील गाडय़ाही पुण्याहूनच सुटतील. महिनाभराच्या या ब्लॉकमुळे मुंबईहून पुण्याला रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. शिवाय दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी गेलेल्या मुंबईकरांना परतीचा प्रवास अडचणीचा ठरणार आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाडय़ा
- मुंबई-पंढरपूर पॅसेंजर (३० नोव्हेंबपर्यंत)
- पंढरपूर-मुंबई पॅसेंजर (३० नोव्हेंबपर्यंत)
- पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस (३० नोव्हेंबर)
- मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस (३० नोव्हेंबर)
- मुंबई-विजापूर पॅसेंजर (२७ नोव्हेंबपर्यंत)
- विजापूर-मुंबई पॅसेंजर (२८ नोव्हेंबपर्यंत)
- नांदेड-पनवेल साप्ताहिक स्पेशल (३० नोव्हेंबपर्यंत)
- पनवेल-नांदेड साप्ताहिक स्पेशल (२४ नोव्हेंबपर्यंत)
- पनवेल-पुणे पॅसेंजर (३० नोव्हेंबपर्यंत)
- पुणे-पनवेल पॅसेंजर (३० नोव्हेंबपर्यंत)
- ..या गाडय़ा पुण्यापर्यंतच
- मुंबई – कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस
- कोल्हापूर – मुंबई कोयना एक्स्प्रेस
- हुबळी- टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
- टिळक टर्मिनस- हुबळी एक्स्प्रेस
- हैदराबाद – मुंबई हुसेनसागर एक्स्प्रेस
- मुंबई – हैदराबाद हुसेनसागर एक्स्प्रेस
- विशाखापट्टणम – टिळक टर्मिनस
- नांदेड – पनवेल एक्स्प्रेस
- दौंड-मनमाड मार्गे वळविण्यात आलेल्या गाडय़ा
- भुसावळ-पुणे एक्स्प्रेस (१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर)
- पुणे-भुसावळ एक्स्प्रेस (१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर)