मुंबई : जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये बेछूट गोळीबार करून तीन प्रवाशांची हत्या केल्याच्या आरोपांतर्गत अटकेत असलेला पोलीस दलाचा (आरपीएफ) हवालदार चेतन सिंह चौधरी याचे घटनेच्या दिवशीचे वर्तन हे नेहमीपेक्षा वेगळे होते. तो विक्षिप्तासारखा वागत होता, असा दावा प्रकरणातील तक्रारदार आणि निवृत्त रेल्वे पोलिसाने बुधवारी दिंडोशी सत्र न्यायालयात उलटतपासणीदरम्यान केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घटनेच्या दिवशी चेतन याची तब्येत ठीक होती की नाही हे आपण सांगू शकत नाही. परंतु, त्या दिवशीचे त्याचे वर्तन नेहमीसारखे नव्हते हे आपल्या लक्षात आले होते, असा दावाही प्रकरणातील या तक्रारदार निवृत्त रेल्वे पोलिसाने केला. शिवाय, लहानपणापासून आतापर्यंत आपल्याला कधीच कौटुंबिक प्रेम, आपुलकी न मिळाल्याने आपली मानसिक स्थिती बिघडल्याचा दावा चेतनने जामिनाची मागणी करताना केला होता. आपली मानसिक स्थिती अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन सामूहिक आत्महत्या करणाऱ्या दिल्लीतील बुराडी कुटुंबासारखी असल्याचा दावाही त्याने केला होता.

हेही वाचा : मुंबई : झोपु योजनांसाठी म्हाडालाही नियोजन प्राधिकरणाचा दर्जा हवा!

कुटुंबीयांचा दावा

घटनेच्या दिवशी चेतन याची तब्येत ठीक होती की नाही हे आपण सांगू शकत नाही. परंतु, त्या दिवशीचे त्याचे वर्तन नेहमीसारखे नव्हते हे आपल्या लक्षात आले.होते. विशेष म्हणजे, चेतन हा मानसिकदृष्ट्या आजारी होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी आणि वकिलांचा आहे.

हेही वाचा : वृद्ध महिलेची ७८ लाखांची सायबर फसवणूक

वरिष्ठांसह तीन प्रवाशांची हत्या केल्याचा आरोप

जयपूरहून मुंबईला येणाऱ्या गाडीत सिंह याने आपल्या वरिष्ठासह तीन प्रवाशांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप असून त्याच्यावर दिंडोशी सत्र न्यायालयात खटला चालवण्यात येत आहे. घटना घडली त्या वेळी तक्रारदारही सिंह याच्यासह गाडीत होता. चेतन याचे वकील राजेंद्र पाटील यांनी या साक्षीदाराची उलटतपासणी घेतली त्या वेळी, आपण आरोपीसह १० ते १२ वेळा काम केल्याचे त्याने सांगितले. तसेच, कर्तव्यावर असताना आरोपीने सहकारी आणि कर्मचारी यांच्याशी कधीही भांडण किंवा बाचाबाची केल्याचे जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधील घटनेपूर्वी आपण कधीच पाहिले नव्हते, असा दावाही या साक्षीदाराने केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaipur mumbai express firing case chetan singh insane behavior on the day of incident mumbai print news css