मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३११ घरांच्या सोडतीसाठीची अर्जविक्री-अर्जस्वीकृती प्रक्रिया संपुष्टात आली असून अर्जविक्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३१ हजार ४३३ इच्छुकांनी अर्ज दाखल झाले आहेत. तर, अनामत रकमेसह अर्ज जमा करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २४ हजार ७५५ अर्ज दाखल झाले आहेत.  ११ डिसेंबरला पात्र अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १३ डिसेंबरच्या सोडतीत नेमके किती अर्जदार सहभागी होणार हे स्पष्ट होईल. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकण मंडळाच्या ५३११ घरांसाठी १५ सप्टेंबरपासून अर्जविक्री-स्वीकृतीला सुरुवात झाली असून ७ नोव्हेंबरला या घरांसाठी सोडत काढण्यात येणार होती. तसेच १८ ऑक्टोबरला अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत संपणार होती. मात्र, १६ ऑक्टोबरला अर्जविक्री-स्वीकृतीस १७ नोव्हेंबपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर ७ नोव्हेंबरची सोडत १३  डिसेंबर रोजी काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

हेही वाचा >>>‘लोकसत्ता लोकांकिका’चे पडघम! प्राथमिक फेरीसाठी जोरदार तयारी सुरू

अर्जविक्री-स्वीकृतीस प्रतिसाद मिळत नसल्याने ही मुदतवाढ देण्यात आली. १५ नोव्हेंबरला अर्जविक्रीची मुदत संपली असून या मुदतीत ५३११ घरांसाठी ३१ हजार ४३३ अर्ज सादर झाले आहेत. तर, शुक्रवारी, १७ नोव्हेंबरला अर्जस्वीकृतीची मुदत संपली असून या मुदतीत २४ हजार ७५५ अर्ज अनामत रक्कमेसह दाखल झाले आहेत.  अर्जाची छाननी सुरू असून ७ डिसेंबरला पात्र अर्जाची प्रारूप यादी तर ११ डिसेंबर पात्र अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.   ही सोडत १३ डिसेंबर रोजी काढण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leaving mhada konkan mandal application with deposit amount amy