maharashtra government approved global tender for dharavi redevelopment project zws 70 | Loksatta

धारावी पुनर्विकासासाठी अखेर बांधकाम निविदा ; सात वर्षांत प्रकल्पाचा पहिला टप्पा करणार पूर्ण

धारावी पुनर्विकासासाठी चौथ्यांदा निविदा मागविण्यास मंजुरी देत सरकारने यासंबंधीचा शासन निर्णय ही जारी केला. 

धारावी पुनर्विकासासाठी अखेर बांधकाम निविदा ; सात वर्षांत प्रकल्पाचा पहिला टप्पा करणार पूर्ण
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : धारावी पुनर्विकासासाठीची बांधकाम निविदा अखेर शनिवारी जारी करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर मागविण्यात आलेल्या या निविदेनुसार ३१ ऑक्टोबपर्यंत इच्छुकांना निविदा सादर करता येणार आहेत. त्यानुसार येत्या तीन ते चार महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर कामाला सुरुवात करत पुढील सात वर्षांत प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे.

धारावी पुनर्विकासासाठी चौथ्यांदा निविदा मागविण्यास मंजुरी देत सरकारने यासंबंधीचा शासन निर्णय ही जारी केला.  पुनर्विकास प्रकल्पाने निविदा काढण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करत शुक्रवारी निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा मागविली. त्यापाठोपाठ शनिवारी बांधकामासाठी निविदा जारी केली आहे. आता  सल्लागाराची नियुक्ती करत पुढे तीन ते चार महिन्यांत बांधकाम निविदा अंतिम करण्याचे  नियोजन आहेत. जागतिक स्तरावर या निविदा मागविण्यात आल्या आहे.  अधिकची बोली लावणारी कंपनी बाजी मारेल. १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान इच्छुकांना निविदा सादर करता येणार आहे. तर ११ ऑक्टोबरला निविदापूर्व बैठक आयोजित करण्यात आली आहे. या आधी तीनदा निविदा काढत विविध कारणांनी निविदा रद्द करण्यात आल्या. तेव्हा  चौथ्यांदा निविदेला कसा प्रतिसाद मिळतो व या वेळी तरी निविदा प्रक्रिया अंतिम होते का आणि  रखडलेला प्रकल्प मार्गी लागतो का हे पाहणे आता महत्त्वाचे असेल.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सामान्यांसाठी परवडणारी घरे बांधा! ; मुख्यमंत्र्यांचे बांधकाम व्यावसायिकांना आवाहन

संबंधित बातम्या

‘तो’ कबुतराचं मांस चिकन म्हणून हॉटेल्सला विकायचा; मुंबईमधील धक्कादायक प्रकार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबईत जमावबंदीच्या अफवा, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण; म्हणाले…
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश; पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; काय सुरू काय बंद? जाणून घ्या
“दोन शहाणे वाघ होते आणि एके दिवशी…”, गोष्ट सांगत सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
विश्लेषण: डोंगर आणि तलावाखालून जाणारा मुंबई-पुणे द्रुतगती बोगदा कसा आहे? त्याचा फायदा काय होईल?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
शेतकऱ्यांच्या मुलांना ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार; खरेदीसाठी सबसिडीही मिळणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार
“आता लवकरच…” लग्नानंतरची पाठकबाईंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
सॅलेडमध्ये मीठ टाकण्याची सवय आहे का? यामुळे होऊ शकते आरोग्याचे नुकसान, लगेच जाणून घ्या
‘बाळासाहेबांची शिवसेने’चे उद्या पुण्यात शक्तीप्रदर्शन; खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
ऐकावं ते नवलचं! १ कोटीचं पॅकेज तरिही ऑफिसमध्ये नाही काम, कर्मचाऱ्याने चक्क बॉसविरोधात कोर्टात दिली तक्रार