उद्यापासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवात यावेळी राजकीय दांडिया बघायला मिळणार आहे. भाजपाने यावेळी शिवसेनेच्या लालबाग परळ विभागात मराठी दांडिया आयोजित करण्याचे ठरवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नियम डावलून ऑस्कर स्पर्धेसाठी ‘छेल्लो शो’ची निवड ?; ‘एफडब्ल्युआयसीई’संघटनेचा दावा

भाजपाकडून मराठी दांडियाचे आयोजन

मुंबई पालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यात अपेक्षित आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात मतदारांना खूष करण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरू आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून भाजपाने एकप्रकारे शिवसेनेवर कुरघोडी केली होती. त्याचाच दुसरा अंक नवरात्रोत्सवात बघायला मिळणार आहे. भाजपाने लालबाग परळमध्ये मराठी गाण्यांवरील आधारित मराठी दांडिया आयोजित करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते हे या मराठी दांडियातील प्रमुख गायक असतील. मुंबईतील बहुतांशी गुजराती बहुल भागात गरबा-दांडियाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. मात्र भाजपाने या कार्यक्रमातून मराठी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi dandiya organized by bjp in lalbagh paral mumbai print news dpj