मुंबई : मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन मेगाब्लाॅक न घेता शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कुठे : माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हेही वाचा – ३०० वर्ष जुन्या बाओबाब झाडाची कत्तल, संतप्त पर्यावरणप्रेमी उद्या शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणार

हार्बर मार्ग

कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर

कधी : रविवारी सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी / वडाळा ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द असतील. पनवेल – कुर्लादरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावतील.

हेही वाचा – व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटेप्रकरणात ईडीचे छापे; कोल्हापूर, नाशिक व पुण्यातील ठिकाणांचा समावेश

पश्चिम रेल्वे

कुठे : मुंबई सेंट्रल – माहिम अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : शनिवारी रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सर्व जलद मार्गावरील लोकल सांताक्रूझ – चर्चगेटदरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Megablock on central railway on sunday mumbai print news ssb 93