मुंबई : मतदान यंत्र (ईव्हीएम) खरेदीसंदर्भातील आपल्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाला ऐकण्याचे आदेश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाने शुक्रवारी फटकारले. न्यायालय म्हणजे टपाल खाते आहे का ? असा संतप्त प्रश्न करून न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या या मागणीबाबत नाराजी व्यक्त केली. सूचना ऐकण्याचे आदेश देण्याची मागणी न्यायालयाकडे का केली जात आहे ? याचिकाकर्त्याने थेट निवडणूक आयोगाकडेच त्याबाबत निवेदन सादर करावे. या सगळ्यात न्यायालयाची भूमिका काय, असा प्रश्न करून मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकण्यास नकार दिला. तसेच, निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचे आदेश याचिकाकर्त्याला दिले.

हेही वाचा : पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग, पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai high court asks petitioner while dismissing plea of evm purchase is court a post account mumbai print news css
First published on: 20-04-2024 at 12:06 IST