Mumbai Local Mega Block : मुंबई लोकल म्हणजे मुंबईरांची लाईफलाईन असं म्हटलं जातं. मुंबईच्या विविध उपनगरीय भागातून रेल्वे अर्थात मुंबई लोकलमधून दरोरज सुमारे ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे लोकलची ओळख ही मुंबईची लाईफलाईन अशी केली जाते. मात्र, जर मुंबईतील लोकलचा ब्लॉक असला तर प्रवाशांचे मोठे हाल होतात. आता मुंबई लोकलला सलग तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. २६, २७ आणि २८ नोव्हेंबर असे तीन दिवस हा विशेष रात्रकालीन ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. त्यामुळे काही गाड्याच्या वेळापत्रकांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेवरील मध्य आणि हार्बर मार्गावर रात्री मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सोमवारी आणि मंगळवारी रात्री १२.५० ते पहाटे ५:३० वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. मुंबई सीएसएमटी आणि वडाळा रोड स्थानकादरम्यान हार्बर मार्गावर अप आणि डाऊन या मार्गावर रात्री मेगाब्लॉक असणार आहे. तसेच भायखळा आणि सीएसएमटी दरम्यान मुख्य मार्गावर धीम्या आणि जलद या मार्गावर ब्लॉक असणार आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेच्या सिझर क्रॉसिंग आणि डबल डायमंड स्वीचच्या नूतनीकरणासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये सोमवारी आणि मंगळवारी (२७/२८ जानेवारी) रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काहीसा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local mega block important news for mumbai there will be a night block on central railway for three consecutive days gkt