मुंबई : मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथे पुन्हा लोकल रुळावरून घसरल्याची घटना बुधवारी दुपारी ४.१३ च्या सुमारास घडली. गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. तसेच सध्या हार्बर मार्ग ठप्प झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकलची चाचणी सुरू होती. मात्र ती अयशस्वी झाली. लोकल घसरली त्याठिकाणी ब्लॉक घेऊन दुरुस्ती करण्यात आली होती. त्याच्यानंतर त्या रुळावरून एक रिकामी लोकल चालवून पाहण्यात आली. मात्र ती घसरली, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – सलमान खान गोळीबार प्रकरण : पिस्तुल पुरवणाऱ्या आरोपीची आत्महत्या

हेही वाचा – बारमधील मद्यभेसळीविरोधात उत्पादन शुल्क विभाग सज्ज! प्रत्येक विभागाला दोन मोजणी यंत्रे वितरित

हार्बर मार्गावरील सीएसएमटी – वडाळा रोड दरम्यान लोकल बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्रवाशांना सीएसएमटी आणि कुर्ला दरम्यान अप आणि डाऊन दिशेने मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local slip again at csmt second incident in three days mumbai print news ssb