मुंबई : अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराजवळ झालेल्या गोळीबाराप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने बुधवारी आत्महत्या केली. आरोपी अनुज थापन याने मुंबई पोलिसांच्या कोठडीत गळफास लावून घेतला. त्याला जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अनुज थापन कोण ?

आरोपी अनुज थापन हा बिष्णोई टोळीशी संबंधित असून त्याच्याविरोधात खंडणी, शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत. अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना दोन पिस्तुले व जिवंत काडतुसे पुरवल्याप्रकरणी सोनू सुभाष चंदर (३७) व अनुज थापन (३२) यांना दक्षिण पंजाबमधून अटक करण्यात आली होती. त्यातील थापनने बुधवारी आत्महत्या केली.

mass sexual assault, murder, women,
धार्मिक स्थळ परिसरात सामूहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरण, आरोपींना २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
Rajasthan Youtuber Arrested For Threatening To Kill Salman Khan Gets Bail
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी; राजस्थानस्थित युट्युबरला जामीन
Anant Radhika Wedding
अंबानींच्या लग्नात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिल्याप्रकरणी अभियंत्याला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
franklin india fund analysis
फंड विश्लेषण: फ्रँकलिन इंडिया प्रायमा फंड
Mumbai, Murder, old mother,
मुंबई : झोपमोड करणाऱ्या वृद्ध आईची हत्या
Trainee pratiksha bhosle police officer commits suicide due to lover betrayal Nagpur
प्रियकराने दगा दिल्यामुळे प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
Charge sheet filed in Salman Khan house firing case
सलमान खानच्या घरावरील गोळीबाराप्रकरणी आरोपपत्र दाखल
Crime news baghpat murder
मुलीच्या प्रियकराला तिच्या कुटुंबानेच संपवलं, व्हिडीओ कॉल करुन बोलवलं आणि…

हेही वाचा – मुंबई : ‘मेट्रो ३’च्या कामासाठी बंद केलेले हुतात्मा चौक, वरळी, दादरमधील रस्ते लवकरच खुले होणार

हेही वाचा – बारमधील मद्यभेसळीविरोधात उत्पादन शुल्क विभाग सज्ज! प्रत्येक विभागाला दोन मोजणी यंत्रे वितरित

थापन हा ट्रकवर मदतनीस म्हणून कामाला होता. बिष्णोई टोळीकडून दोन्ही आरोपींना दोन पिस्तुले व ४० काडतुसे पुरवण्यात आली होती. ती पिस्तुले देण्यासाठी चंदर व थापन दोघेही १५ मार्चला पनवेलला गेले होते. ते पनवेलमध्ये तीन तास थांबले होते. पिस्तुल गुप्ता व पाल यांना देण्यापूर्वी चंदर व थापन यांनी दोन गोळ्या झाडल्याचा संशय होता.