मुंबईत सध्या सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट झाला आले. गेल्या आठड्यात चार सोनसाखळी चोरण्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी नामी शक्कल लढवली आहे. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी डिलिव्हरी बॉईजच्या पोशाषात चोरट्यांवर नजर ठेऊन त्यांना ताब्यात घेतले. फिरोज शेख आणि जाफर जाफरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
काही दिवसांपासून मुंबईत सोनसाखळी चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोनसाखळी चोरीच्या चार घटना उघडीस आल्या आहेत. या चारही घटनेतील आरोप एकच आहेत. अखेर कस्तूरबा पोलिसांनी या चोरट्यांना पडकण्यासाठी सापळा रचला होता. यावेळी ३०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्याची माहिती डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी दिली.
दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधून चोरट्यांची बाईक सापडली. त्यानंतर पोलिसांनी कोणाला संशय येऊ नये म्हणून तीन दिवस या परिसरात डिलिव्हरी बॉईजच्या पोशाखात पाहारा दिला. आरोपीची ओळख पटताच पोलिसांनी फिरोज शेख याला ताब्यात घेतले. तसेच त्याने दिलेल्या माहितीनंतर या गुन्ह्यातील मुख्य आरोप जाफर जाफरी यालाही अटक करण्यात आली. जाफर जाफरी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर १५ पेक्षाही जास्त दरोड्यांचे गुन्हे दाखल आहेत. दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.