लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत आज, गुरुवारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. महामार्गावरील मुंबई वाहिनीवर वडगाव हद्दीत साखळी क्रमांक ७४/९०० किमी आणि खंडाळा हद्दीत साखळी क्रमांक ५६/९०० किमी येथे हे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी दुपारी १२ वा ते दुपारी २ वाजेपर्यंत दोन तास वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे.

आणखी वाचा-मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा

त्या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने (चारचाकी ) किवळे पुलावरून जुन्या मुंबई -पुणे महामार्गावरून मुंबई दिशेला वळविण्यात येणार आहेत. पुणे ते मुंबई जुन्या महामार्गावरून येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोल नाका येथून द्रुतगती महामार्गावर मुंबई दिशेने सोडण्यात येतील अशी माहिती एमएसआरडीसीने दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai pune expressway closed for two hours today mumbai print news mrj