Mumbai Breaking News Today 11 July 2025 : गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दिल्ली दौऱ्याची मोठी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. ऐन अधिवेशनाच्या गडबडीत उपमुख्यमंत्र्यांनी अचानक दिल्ली गाठल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आमदार रोहित पवार यांनी विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामागे महायुतीमधील अंतर्गत कुरघोड्या कारणीभूत असल्याचा दावा केला आहे.
या बरोबरच राज्यभर विविध ठिकाणी मुसळधार पावसानेही हजेरी लावल्याचे दिसत आहे. दरम्यान, मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर जिल्ह्यातील राजकीय व इतर महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Pune Mumbai Nagpur Latest News Updates in Marathi
Vidarbha Weather Updates: आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय, पावसाची स्थिती काय असणार ?
कमी दाबाचे क्षेत्र निवळले असतानाच किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे. यामुळे राज्यात पाऊस कमी झाला आहे.
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह ११ जुलै २०२५