Mumbai Pune Nagpur Rain Updates : जूनअखेरीस राज्यात मोसमी पावसाने जोर धरला असून हा पाऊस आता राज्यभर कोसळत आहे. मोसमी पावसाचे वारे दाखल झाले तरी विदर्भाकडे मोसमी पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, बुधवारपासून हा पाऊस आभाळ फाटल्यागत कोसळत आहे. दरम्यान, आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

महिला कमावती असली तरी विभक्त पतीकडून पोटगी मिळण्यास पात्र आहे, तिला त्यापासून वंचित ठेवता येणार नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवले. महिलेलाही तिची जीवनशैली कायम ठेवणे गरजेचे आहे, अशी टिप्पणीही न्यायालयाने कुटुंब न्यायालयाचा पोटगीच्या निर्णयात हस्तक्षेपास नकार देताना केली.

दुर्मीळ विकारामुळे एका बांगलादेशी तरुणाची मूत्रपिंडे निकामी झाली. त्याच्यासमोर मूत्रपिंड प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय उरला होता. मूत्रपिंडदाता न मिळाल्याने अखेर त्याच्या आईनेच मूत्रपिंड देण्याची तयारी दर्शविली. मात्र, तिचा रक्तगट वेगळा होता. पुण्यातील डॉक्टरांनी हे आव्हान पेलून या तरुणावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली.

मुंबई, मुंबई महानगरातील, पुणे शहर आणि परिसर तसंच नागपूर शहराशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या Live blog च्यामाध्यमातून मिळेल.

Live Updates

Pune Nagpur Mumbai Breaking News Updates in Marathi

13:31 (IST) 27 Jun 2025

मुंबईतून पिस्तुल आणि काडतुसांचा साठा जप्त… उत्तर प्रदेशातील तरूणाला अटक…

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिवडी परिसरात केलेल्या कारवाईत पिस्तुलांचा साठा जप्त केला. याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील २४ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तीन पिस्तुल, १० काडतुसे जप्त करण्यात आली. …सविस्तर बातमी
13:28 (IST) 27 Jun 2025

नागपूर : खबरदार, माझ्या मुलीशी संपर्क साधशील तर…, तरुणाचे अपहरण करून निर्जन स्थळी सोडले

झालेल्या प्रकारानंतर मित्राच्या मोबाईलवर संपर्क साधून आर्यन कसाबसा नागपूरात आला आणि तडक जरीपटका पोलिस ठाण्यात पोचला. …वाचा सविस्तर
13:27 (IST) 27 Jun 2025

उत्तन – विरार सागरी सेतू: प्रकल्पाच्या खर्चात ३१ हजार कोटींची कपात, खर्च ८७ हजार कोटींवरून ५२ हजार कोटींवर

एकाच ठिकाणी दोन प्रकल्प होऊ घातल्याने एक प्रकल्प रद्द करणे आवश्यक होते. त्यामुळे वर्सोवा – विरार सागरी सेतू रद्द करण्यात आला आहे. …अधिक वाचा
13:24 (IST) 27 Jun 2025

मुंबई : बंद पडलेल्या मराठी शाळेत कापडाची दुकाने, सरकारी जागेचा व्यावसायिक वापर

गवाणकर चौक येथील सरस्वती प्राथमिक आणि माध्यमिक ही सुमारे शंभर वर्षांहून जुनी शाळा २०१५ पासून बंद झाली आहे. …सविस्तर बातमी
13:22 (IST) 27 Jun 2025

महापालिकेच्या क्रीडासंकुलाची दुरवस्था; साहित्याची नासधूस, अस्वच्छता, गर्दुल्ल्यांचा वावर अशा अनेक समस्यांचा विळखा

वसई-विरार महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे वसई पश्चिमेतील साईनगर क्रीडासंकुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. …अधिक वाचा
12:52 (IST) 27 Jun 2025

‘धर्मनिरपेक्ष’ला ‘पंथनिरपेक्ष’,‘श्रद्धे’ला ‘धर्म’ छापले, समरसता शब्दाचा…

भारतीय संविधानाची प्रास्ताविका ही संविधानाचा आत्मा मानली जाते. संविधानाचा उद्देश, तत्त्वज्ञान आणि मूलभूत मूल्ये प्रास्ताविका स्पष्ट करते. …वाचा सविस्तर
12:38 (IST) 27 Jun 2025

अमरावती पोलिसांचा ‘मास्टरप्लॅन’, अमली पदार्थांची तस्करी…

अमली पदार्थांच्‍या तस्‍करीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणे अशा गोष्टी करीत गुन्‍हेगारीत गुंतणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढत आहे. …वाचा सविस्तर
12:12 (IST) 27 Jun 2025

पुणे : सिंहगड रस्ता भागात ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सई स. प. महाविद्यालयात कला शाखेत द्वितीय वर्षात होती. …सविस्तर वाचा
12:03 (IST) 27 Jun 2025

भूतबाधा झाल्याचे सांगत अल्पवयीन मुलाला चटके आणि बेदम मारहाण, भांडुपमधील घटना

भांडूपमधील जंगलमंगल रोड परिसरात आरोपी वैभव कोकरे (३५) याची बाटलीबंद पाणी विकण्याची एजन्सी आहे. …अधिक वाचा

मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह २७ जून २०२५