Latest Mumbai Pune Nagpur News Updates : सध्या राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून गेल्या तीन चार दिवसांपासून कोकणासह इतर काही भागांत पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, घाटमाथ्यावर आणि पूर्व विदर्भात आज अतिमुसळधार पावसाचा (ऑरेंज अलर्ट) इशारा तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच मंत्री आशीष शेलार यांनी मनसेच्या आंदोलनावर टीका केली आहे. “पहलगाममध्ये अतिरेक्यांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या, इथे मनसे आंदोलक निष्पाप हिंदूंना भाषा विचारून मारहाण करीत आहेत” अशी टीका सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई भाजप अध्यक्ष ॲड. आशीष शेलार यांनी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या जिल्ह्यांतील पावसाच्या तसेच राजकीय व इतर घडामोडींसंदर्भातील बातम्या जाणून घ्या.
Pune Nagpur Mumbai News Updates in Marathi
Vidarbha Rain Updates : विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई पुणे नागपूर न्यूज ७ जुलै २०२५