Mumbai News Updates : मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून काही भागात गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. दरम्यान, पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत मुसळधार पाऊस कोसळून काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सकाळी जारी केलेल्या सुधारित अंदाजानुसार मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे कुंडलिका, आंबा नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. रोहा, नागोठणे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाताळगंगा नदी इशारा पातळीवर वाहत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पाच तालुक्यांतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरांतील, परिसरांतील पावसाच्या तसेच इतर ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 19 June 2025

13:14 (IST) 19 Jun 2025

विमान दुर्घटनेतील डोंबिवलीतील हवाई सेविकेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

गुरूवारी सकाळी येथील शिवमंदिर रस्त्यावरील स्मशानभूमीत नातेवाईक, शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. …सविस्तर वाचा
13:06 (IST) 19 Jun 2025

Khadakwasla Dam News: सावधान! जाधववाडी तलावातून अनियंत्रित विसर्गाची शक्यता; खडकवासला धरणातूनही दुपारी विसर्ग

जाधववाडी हा द्वारविरहीत तलाव ९५ टक्क्यांपर्यंत भरला असून सद्यस्थितीचा पाऊस आणि धरणातील येवा वाढल्यामुळे सुधा नदी (इंद्रायणी नदी) पात्रात कोणत्याही क्षणी जाधववाडी तलावातून अनियंत्रित विसर्ग चालू होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. …सविस्तर वाचा
12:54 (IST) 19 Jun 2025

सुकेशिनी तेलगोटेंनी निविदा न काढता ६५ लाखांचे कंत्राट दिले, अहवालात सत्य उघड

भंडारा येथे २०२१-२२ मध्ये सुकेशिनी तेलगोटे सहाय्यक आयुक्त असताना शासकीय वसतिगृहांसाठीच्या क्रीडांगण विकास योजनेत गैरप्रकार झाल्याची तक्रार रवींद्र कोटंबकर यांनी प्रादेशिक उपायुक्तांकडे २८ एप्रिल २०२५ रोजी केली होती. …सविस्तर वाचा
12:33 (IST) 19 Jun 2025

पुणे : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

पुणे शहराला पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे धरण साठ्यांत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून दुपारी १ वाजता दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडणार आहे. यामुळे नदी पात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

12:30 (IST) 19 Jun 2025

पालखी सोहळ्यासाठी ‘टॉयलेट सेवा’ मोबाईल ॲप

तंत्रज्ञान आधारीत या ॲपच्या माध्यमातून वारी मार्गावरील फिरती शौचालये आणि त्यांची स्वच्छता यांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे. …सविस्तर बातमी
12:20 (IST) 19 Jun 2025

काँग्रेस आजमावणार एकीचे बळ, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी रणनीती…

न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. तेंव्हापासून राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

सविस्तर वाचा…

12:19 (IST) 19 Jun 2025

चंद्रपूर : आसोलामेंढा कालव्यावरील बंदनलिकेचे अपूर्ण काम भोवले, पीवीआर कंपनीला ४१ कोटींचा दंड

आजपर्यंत या कंपनीला ४१ कोटींचा दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम सुरक्षा रकमेपेक्षा अधिक होते तेव्हा नियमाप्रमाणे करारनामा रद्द करून नवीन निविदा काढावी लागते.

सविस्तर वाचा…

12:19 (IST) 19 Jun 2025

‘एनएचएम’चे हजारो कर्मचारी तीन महिन्यांपासून वेतनाविना, आर्थिक गणित कोलमडले

तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

सविस्तर वाचा…

12:18 (IST) 19 Jun 2025

Raigad Flood : रायगड जिल्ह्यात पूरस्थिती; पाच तालुक्यांमधील शाळांना सुट्टी

जिल्ह्यात रात्रभर पावासाचा कहर सुरू होता. त्यामुळे नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली.

सविस्तर वाचा…

रायगड पूर ब्रेकिंग न्यूज टुडे