मुंबई : सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून कोकणालाही पावसाने अक्षरशः झोडपले आहे. अतिवृष्टीमुळे शुक्रवार, २६ जुलै रोजी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : वैद्यकीय महाविद्यालयांची सुरक्षा कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या हाती, ८३१ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणार

या पार्श्वभूमीवर विद्यार्थीहित लक्षात घेता व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या आज शुक्रवार, २६ जुलै रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात रायगड रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठ प्रशासनाने घेतला. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university exams in raigad and ratnagiri district postponed due to heavy rain mumbai print news css