लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : अभिनेत्री करिष्मा तन्नाचा पती वरूण बंगेरा व अभिनेता समीर कोचर यांनी एक कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार अंधेरी पोलिसांकडे केली असून याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे येथे सदनिका देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.

आणखी वाचा-संजय राऊतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य : नितेश राणेंच्या नावे जामीनपात्र वॉरंट

प्रोनित प्रेम नाथ व पत्नी अमीषा यांच्याविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच आला आहे. तक्रारदार अभिनेता समीर कोचर याने पोलिसांकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार कोचर व करिष्मा तन्नाचा पती वरूण बंगेरा यांनी डिसेंबर २०२० मध्ये वांद्रे येथे सदनिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी वांद्रे पश्चिम येथील पाली गाव परिसरात प्रोनित नाथ व त्याची पत्नी अमिषा चार मजल्यांची इमारत बांधत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कोचरने एक कोटी ९५ लाख रुपये व बंगेरा याने ९० लाख रुपयांत सदनिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कोचरने ५८ लाख ५० हजार रुपये व बंगेराने ४४ लाख ६६ हजार रुपये भरले. त्यानंतर जून २०२३ मध्ये आरोपीने आपल्याला सदनिका विकायच्या नसल्याचे कळवले. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी संबंधित सदनिका अन्य कोणाला तरी विकण्यात आल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी अंधेरी पोलिसांकडे तक्रार केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One crore rupees fraud with actress karishma tanna husband sameer kochhar mumbai print news mrj