मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण खुद्द शरद पवारच पार्थ पवार यांच्या उमेदवारीबद्दल फारसे अनुकूल नसल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांनी थेट पार्थ पवारांच्या नावाला विरोध केला नसला तरी पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर पक्षबांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याना संधी कधी मिळणार? असा सवाल त्यांनी पार्थ पवारांच्या उमेदवारीची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना विचारला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एबीपी माझा वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. शरद पवारांच्या या भूमिकेवर अजित पवारांनी अजून तरी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी पार्थ पवार यांच्या नावाची मागच्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होती. मागच्या काही वर्षात झालेल्या निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यातील हा मतदारसंघ जिंकता आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघातून अजित पवारांचे सुपूत्र पार्थ पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवेल अशी चर्चा होती.

पण आता शरद पवारांनीच या चर्चांना ब्रेक लावला आहे. मावळमधून लक्ष्मण जगताप निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरु आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यातील किती जागांची मागणी करायची. मित्र पक्षांना आघाडीत कसे सामावून घ्यायचे यावर या बैठकीत विचारमंथन सुरु आहे. स्वत:हा शरद पवारांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar is not favourable for parth pawar candidature