मुंबई :  संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या एका व्यंगचित्रावरून मंगळवारी शिवसेना व भाजपमध्ये खडाखडी झाली आणि उभयतांनी परस्परांना सुनावण्याची संधी सोडली नाही. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नामर्दासारखे व्यंगचित्र दाखवू नका, असा इशारा भाजप खासदार पूनम महाजन यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिला आणि त्यांनी ट्विटरवरून ते व्यंगचित्र काढले. मात्र पूनम महाजन यांना भाजपमध्ये स्थान काय, त्या सध्या काय करतात, असा परखड सवाल राऊत यांनी केला.

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी रविवारी संवाद साधल्यानंतर भाजप व शिवसेना नेत्यांकडून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना खासदार राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्वीट केले होते.  कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळेङ्घबघा नीट  अशी छायाचित्र ओळ देत या व्यंगचित्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एका खुर्चीवर समोरील खुर्चीवर पाय ठेवून बसल्याचे दाखविले होते. समोर उभ्या असलेल्या ज्येष्ठ दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांना ‘हॅव अ सीट’ असे ते म्हणत होते. या वेळी खुर्चीच्या बाजूला एक छोटे स्टूल व्यंगचित्रात होते.

त्यावर भाजप खासदार पूनम महाजन यांनी प्रत्युत्तर देताना  स्व. बाळासाहेब व स्व. प्रमोदजी, या दोन मर्दानी हिंदूुत्वासाठी युती केली होती. नामर्दासारखे व्यंगचित्र दाखवू नका,ह्ण असे ट्विटरवरून सुनावले होते. त्यानंतर राऊत यांनी व्यंगचित्र हटविले.  त्याविषयी राऊत म्हणाले, हे व्यंगचित्र सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे होते. ते ट्वीट हटविले नाही, जिथे पोचवायचे, तिथे पोचविले आहे. व्यंगचित्रात प्रमोद महाजन बाळासाहेबांसमोर उभे आहेत, हा भाजपबरोबरच्या युतीचा  सुरुवातीचा काळ होता.  महारमष्ट्रातील भाजप नेत्यांनी सोमवारी शिवसेनेसंबंधी जी वक्तव्ये केली, त्यात सत्य काय होते, हे दाखवण्यासाठी हे व्यंगचित्र समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केले होते. मी प्रमोद महाजनांवर वैयक्तिक टिप्पणी केली नव्हती.

‘विलेपार्लेत विजय’

विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीत देशात पहिल्यांदा शिवसेनेने हिंदूुत्वाच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवली. हिंदूुत्वाचा मुद्दा घेऊन शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी प्रचार केला होता आणि काँग्रेस व भाजपचे उमेदवार असतानाही विजय मिळवला होता. त्यानंतर भाजपचे मोठे नेते शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव घेऊन आले, असे उत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिले. शिवसेनेच्या हिंदूुत्वाच्या निव्वळ गप्पा आहेत, भाषणापुरते व कागदावरचे आहे आणि राम मंदिर आंदोलनाच्या वेळीही शिवसेना नेते केवळ तोंडाच्या वाफा दडवत होते, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर आशीष शेलार यांनी शिवसेनेच्या आधी निवडून आलेल्या पक्षाच्या आमदारांची नावे सांगत भाजपच पहिला हिंदूुत्ववादी पक्ष असल्याचा दावा केला. भाजपचे हे दावे विलेपार्ले निवडणुकीचा व युतीचा इतिहास सांगत राऊत यांनी खोडून काढले. विलेपार्ले निवडणुकीत बाळासाहेबांनी हिंदूुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आणला. काँग्रेसबरोबर भाजपनेही शिवसेनेविरोधात विलेपार्लेची निवडणूक लढवली असली तरी शिवसेनेचा विजय झाला. यानंतर भाजपला झटका बसला होता. हिंदूत्वाचा मुद्दा लोकांना भिडला असून देशात हिंदूत्व वाढेल आणि त्यावर निवडणूक जिंकू शकतो असा विश्वास निर्माण झाला. त्यामुळेच भाजपचे मोठे नेते बाळासाहेबांकडे युतीचा प्रस्ताव घेऊन आले. एकत्र निवडणूक लढू अशी विनंती केली. बाळासाहेबांचे मन मोठं असल्याने आणि हिंदूत्वाच्या मतांचे विभाजन होऊ नये यासाठी बाळासाहेबांनी तो प्रस्ताव मान्य केला, याची आठवण राऊत यांनी करून दिली. पण त्या वेळी लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन असे मोठे नेते होते, असा चिमटाही संजय राऊत यांनी काढला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena and bjp clashed over cartoon tweeted by sanjay raut zws
First published on: 26-01-2022 at 04:26 IST