मुंबई : विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी अमित गोरखे, इद्रिस नायकवडी, कृपाल तुमाने, सुनिल शिंदे आणि डॉ. प्रज्ञा सातव यांची तालिक सभापतीपदी निवड केली.

विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात वंदे मातरम् आणि राज्य गीताने झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा परिचय करून दिल्यानंतर राज्य सरकारचे विविध अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आले. वित्त राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांनी २०२५ – २६ या वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. सभापती प्रा. राम शिंदे यांनी प्रा. राम शिंदे यांनी अमित गोरखे, इद्रिस नायकवडी, कृपाल तुमाने, सुनिल शिंदे आणि डॉ. प्रज्ञा सातव यांची तालिक सभापतीपदी निवड केली.

नारळीकर, अरुणकाक जगताप,रामदास आंबटकर यांना श्रद्धांजली

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, विधान परिषदेचे माजी सदस्य अरुणकाका भिमराव जगताप आणि डॉ. रामदास भगवानजी आंबटकर यांच्या निधनाबाबत सभापती प्रा. राम शिंदे यांनी शोकप्रस्ताव मांडला. शिंदे यांनी डॉ. नारळीकर, अरुणकाका जगताप आणि डॉ. रामदास आंबटकर यांचा जीवन प्रवास आणि कार्यकर्तृत्वाचा आढावाही घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.