मुंबई : आग्रीपाडा येथील इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून ३३ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोहित किशोर गुरभानी असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून तो नायर रूग्णालयात नोंदणी सहाय्यक पदावर कार्यरत होता.

हेही वाचा – बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेची फसवणूक, लाखोंचे वाहन कर्ज घेणाऱ्या तिघांना अटक

हेही वाचा – गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांच्यातील नियोजनाचा अभाव का? अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधन समिती

आग्रीपाडा येथील टोपाझ इमारतीच्या १५व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही इमारत रुग्णालयात कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. त्याला तातडीने नायर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. रोहित स्किझोफ्रेनियाग्रस्त होता. गेल्या सात ते आठ वर्षांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत. आत्महत्या करताना चित्रीकरण समाज माध्यमावर वायरल झाले होते.