मुंबईः बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे वाहन कर्ज घेऊन बँकेची फसवणूक करणाऱ्या तिघांना मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून एक महागडी मोटरगाडी जप्त करण्यात आली आहे.

मलबार हिल परिसरातील एका बँकेकडे बनावट कागदपत्रे सादर करून आरोपींनी ४५ लाखाचे वाहन कर्ज घेतले होते. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बँक व्यवस्थापकाने मलबार हिल पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तेव्हा तन्मय सरकार व इम्रान हुसेन मेहरदिन या दोघांनी पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या तन्मय तापस सरकार यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड व इन्कम टॅक्स रिटर्न कागदपत्र बेकायदेशीरपणे मिळवली. मग त्या कागदपत्रांमध्ये आवश्यक बदल करून ती बनावट कागदपत्रे वाहन कर्ज घेण्यासाठी बँकेकडे सुपूर्द केली. बँकेने त्या कागदपत्रांच्या आधारे ४५ लाखाचे वाहन कर्ज दिले होते. ही माहिती मिळाल्यानंतर या गुन्ह्यातील आरोपी इम्रान हुसैन हा जयपुर ते वांद्रे या एक्सप्रेसमधून प्रवास करीत असल्याचे कळताच पोलिसांनी धावत्या एक्सप्रेसमध्ये शोध घेऊन इम्रानला पकडले. त्यानंतर पोलिसांनी दुसरा आरोपी तन्मय सरकार उर्फ अस्फाक अजमेरी (३०) याला पकडले.

Suicide, Agripada, building, आत्महत्या,
आग्रीपाडा येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Gokhale Bridge, Barfiwala Bridge,
गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांच्यातील नियोजनाचा अभाव का? अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधन समिती
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण

हेही वाचा – मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत अवघा १७ टक्के साठा, पालिका प्रशासन घेणार मंगळवारी आढावा

हेही वाचा – गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांच्यातील नियोजनाचा अभाव का? अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधन समिती

अजमेरी हा मुळचा गुजरातचा असून त्याने तन्मय सरकार या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली व त्या कागदपत्रांच्या आधारे बँकेतून वाहन कर्ज घेतल्याचे कबूल केले. त्यानंतर या गुन्ह्याचा मुख्य आरोपी साईनाथ गंजी उर्फ विकास याला पकडले. साईनाथ हा कौशल भियाणी या नावाचा वापर करीत होता. साईनाथने अजमेरी याला वाहन कर्ज घेण्यासाठी बनावट कागदपत्र बनवून दिल्याचे कबूल केले. मूळचा तेलंगणाचा असलेल्या साईनाथ याच्यावर पार्कसाईट, वि.प.मार्ग आणि गुन्हे शाखेत गुन्हा दाखल आहे.