मुंबई :  प्रचार गीतामधील जय भवानी आण हिंदू शब्दावर निवडणूक आयोगाने घेतलेले आक्षेप हे  नियमानुसार घेण्यात आले आहेत. परंतु  ठाकरे गटाने केलेल्या फेरविचार अर्जावर आयोग लवकरच निर्णय घेईल अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकिलगम यांनी बुधवारी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचार गीतामधील काही शब्दांवर आयोगाच्या राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण समितीने घेतलेले आक्षेप हे आयोगाच्या नियमानुसारच आहेत. मात्र या दोन्ही शब्दांबाबत फेरविचार करण्याची विनंती ठाकरे गटाने कालच केली असून त्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील अपिलीय समिती निर्णय घेईल. आतापर्यंत अशा प्रकारच्या ३९ प्रकरणांत आयोगाने आक्षेप घेतल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली.

२०४ उमेदवार रिंगणात

मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विदर्भ व मराठवाडयातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ लोकसभा मतदारसंघांतील प्रचार आज संपला असून तेथे शुक्रवारी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी एकूण १६ हजार ५८९ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या निवडणुकीत एक कोटी ४९ लाख २५ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या टप्प्यात २०४ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक ३७ उमेदवार अमरावती, परभणी (३४) आणि हिंगोलीत ३३ उमेदवार रिंगणात आहेत.

हेही वाचा >>> लोकसभा निवडणूक हातून निसटत असल्याने मोदी घाबरले, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

मतदानाची घटती टक्केवारी हा राजकीय पक्षांप्रमाणेच आयोगाच्याही चिंतेचा विषय झाला आहे. पहिल्या टप्प्यातील पाचपैकी केवळ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात गतवेळच्या तुलनेत ३ टक्के मतदान वाढ झाली असून अन्य सर्व मतदारसंघात एक ते दोन टक्के घट झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्यात मतदान वाढावे यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. 

राज्यात ४९१ कोटींचा मुद्देमाल जप्तनिवडणूक काळात  महाराष्ट्रात ४३.९६ कोटींची रोख रक्कम तर ३४.७८ कोटी रुपयांचे मद्य, ८८.३७ कोटींचे मौल्यवान धातू २१६.४७ कोटींचे अंमली पदार्थ असा एकूण ४७१ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group request ec to rethink jai bhavani and hindu word in theme song zws