मुंबई : अंमलीपदार्थांची विक्री करून तस्करांनी कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचे गुन्हे शाखेच्या तपासातून निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेने याप्रकरणात सुमारे तीन कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. चार तस्करांच्या मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह नाशिक येथील मालमत्तांचा यामध्ये समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने १६ ऑगस्ट रोजी अंमलीपदार्थ विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध कारवाई करून एमडी आणि चरसचा साठा जप्त केला. या गुन्ह्यात अद्यापपर्यंत एकूण १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. साहिल रमजान अली खान उर्फ मस्सा (२७), मोहमद अजमल कासम शेख (४५), शमसुद्दीन नियाजउद्दीन शहा (२२), इमरान अस्लम पठाण (३७), मोहमद तौसिफ शौकत अली मन्सुरी (२७), मोहमद इस्माईल सलीम सिद्धीकी (२४), सर्फराज शाबीरअली खान उर्फ गोल्डन भूरा (३६), रईस अमीन कुरेशी (३८), प्रियंका अशोक कारकौर (२४), काएनात साहिल खान (२८), सईद सज्जद शेख (३०) आणि अली जवाद जाफर मिर्झा (३१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा – मुंबई : बनावट डॉक्टरांच्या टोळीला नव्या गुन्ह्यांत अटक, चौकशीत ९ तक्रारदारांची माहिती उघड

हेही वाचा – मुंबई : लोकलच्या मालडब्यातून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या ३११ प्रवाशांवर कारवाई, ४६ हजार रुपये दंड वसूल

यापैकी चार जणांनी अंमलीपदार्थ विक्रीतून खरेदी केलेल्या मालमत्तावर गुन्हे शाखेने टाच आणली आहे. यामध्ये मस्सा याचे मालेगाव, नाशिक येथील एक फार्म हाऊस, शिळफाटा येथील सदनिका, घणसोली, नवी मुंबई येथील रो हाऊस आणि ५१ ग्रॅम सोन्यासह ३५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. त्याचबरोबर काएनातचे घणसोलीतील रो हाऊस, शिळफाटा येथील घर, तसेच सर्फराजची मोटारगाडी आणि मुंब्रा येथील सदनिका, तसेच प्रियंकाच्या घरातून मिळालेल्या १७ लाख रुपयांच्या रकमेचा यात समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The investigation of the crime branch has revealed that the traffickers have bought property worth crores by selling drugs mumbai print news ssb