To speed up the projects in Thane MP Shrikant Shinde instruction to authorities mumbai | Loksatta

‘ठाण्यातील प्रकल्पांना गती द्या’; खासदार श्रीकांत शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना

मोठागाव ठाकुर्ली – माणकोली खाडीपूल आणि ऐरोली-कटाई नाका उन्नत रस्ता प्रकल्पाचाही शिंदे यांनी आढावा घेतला.

‘ठाण्यातील प्रकल्पांना गती द्या’; खासदार श्रीकांत शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना
खासदार श्रीकांत शिंदे

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) ठाण्यात हाती असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी घेतला. यावेळी शिंदे यांनी महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्यासह ‘एमएमआरडीए’मधील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. या प्रकल्पांची कामे जलदगतीने पूर्ण करण्याची सूचना शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली.

हेही वाचा- दसरा मेळाव्यानिमित्त मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”

‘एमएमआरडीए’ने ठाण्याच्या विकासाच्या दृष्टीने मेट्रो, भूमिगत मार्ग, सागरीमार्ग असे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांच्या कामांचा आढावा शिंदे यांनी घेतला. ठाणे आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या २०.७५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेसाठी सायस्त्रा या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिकेच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबवून कामास सुरुवात होणे अपेक्षित आहे. लवकरात लवकर निविदा काढून या कामाला सुरुवात करावी, अशी सूचना यावेळी शिंदे यांनी ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांना केली.

हेही वाचा- सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईची झळ, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ

मेट्रोसह कल्याण रिंग रोड

मोठागाव ठाकुर्ली – माणकोली खाडीपूल आणि ऐरोली-कटाई नाका उन्नत रस्ता प्रकल्पाचाही शिंदे यांनी यावेळी आढावा घेतला. नवी मुंबई ते डोंबिवली प्रवास केवळ १५ मिनिटांत पार करता यावे यासाठी हाती घेण्यात आलेल्या ऐरोली – कटाई नाका उन्नत रस्ता प्रकल्पाचे काम २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुंबई: देवनार येथील स्वामी समर्थांच्या मठात चोरी; दानपेटीतील १४ हजारांची रक्कम लंपास

संबंधित बातम्या

मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प अखेर अदानी समुहाकडे; अदानीची सर्वाधिक पाच हजार कोटी रुपयांची बोली
बनावट नोटांचे प्रकरण मिटवण्यासाठी समीर वानखेडेंची देवेंद्र फडणवीसांनी मदत घेतली- नवाब मलिक
राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मला समजत नाही की…!”
ही ‘राज’नीती मुंबईत कशी जिंकणार?
मुंबई: रेल्वे गाड्यांवर दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ; मध्य-पश्चिम मुंबई उपनगरीय हद्दीत सर्वाधिक घटना

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मोठी बातमी: अवघ्या दोन महिन्यातच तुकाराम मुंढेंची बदली
“…तेव्हा नाही का वाटली लाज?”; उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंनी चक्क सादर केली कविता
सुजलेला चेहरा, अशक्तपणा अन्…; अभिनेत्री श्रुती हसनची अशी अवस्था का झाली? आजारपणातील फोटो शेअर करत म्हणाली…
“…भगतसिंह कोश्यारींचं अजूनही लग्न झालं नाही”, ‘त्या’ विधानावरून राज ठाकरेंची टोलेबाजी!
Video: ‘बिग बॉस’च्या घरात जेवणावरुन वाद, अर्चनाने शिवच्या भरलेल्या ताटामधून चपाती उचलली अन्…; व्हिडीओ व्हायरल