पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम

मुंबईत सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या वाहतुकीवरही परिणाम झाला.

पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम
(संग्रहीत छायाचित्र)

मुंबई : मुंबईत सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबईत हिंदमाता, किंग सर्कल, शीव येथे रस्ते वाहतूक मंदावली होती. अंधेरी सब-वे येथील वाहतूक काही काळ बंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मानखुर्द रेल्वे स्थानक पुलावरील दक्षिण वाहिनीवर वाहतूक मंदगतीने सुरू होती. खार सब-वे येथेही वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. अंधेरी सब-वे येथे पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर काही काळ तेथील वाहतूक बंद करण्यात आली होती.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
किरकोळ वादातून एकाची हत्या
फोटो गॅलरी