आर्थिक वादातून दोघांनी एका दुकानदारांची हत्या केल्याची घटना चेंबूरमध्ये घडली आहे. याबाबत गोवंडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दिल्ली येथून दोघांना ताब्यात घेतले आहे.चेंबूरमधील आचार्य महाविद्यालयासमोर सुभाष गुप्ता यांचे शिव पेपर मार्ट दुकान आहे. सुभाष गुप्ता १९ मार्च रोजी दुकानात होते. रात्री नऊच्या सुमारास दोघेजण त्यांच्या दुकानात आले. या दोघांनी सुभाष गुप्ता आणि त्यांचा मुलगा विष्णू गुप्ता यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. दोघाना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>मुंबई: मालवणी झोपडपट्टीचा धारावीच्या धर्तीवर पुनर्विकास! प्रकल्प सध्या प्राथमिक स्तरावर

मात्र गुरुवारी सकाळी सुभाष गुप्ता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गोवंडी पोलिसांनी याबाबत हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सुभाष गुप्ता यांची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपीना पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आर्थिक वादातून सुभाष गुप्ता यंची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two arrested in delhi in connection with the murder of a shopkeeper mumbai print news amy