मुंबई : ज्युनिअर रिसर्च फेलोशिप, सहाय्यक प्राध्यापक आणि पीएचडी प्रवेश यांच्यासाठी पात्रतेचा निकष असलेली यूजीसी-नेट परीक्षा यंदा वर्षाअखेरपासून म्हणजेच ३१ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवार नोंदणी करू शकतील. एनटीएकडून यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

त्यानुसार या परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच ही परीक्षा ३१ डिसेंबरला सुरू होऊन ७ जानेवारी २०२६ रोजी संपणार आहे. ही परीक्षा संपूर्ण देशभरात ८५ विविध विषयांसाठी संगणक आधारित पद्धतीने होईल. परीक्षा कोणकोणत्या शहरांमध्ये आणि कोणत्या केंद्रांवर होईल, याची यादी एनटीएच्या https://ugcnet.nta.nic.in या संकेतस्थळावर परीक्षेच्या १० दिवस आधी प्रसिद्ध होणार आहे.

उमेदवारांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ७ नोव्हेंबर असेल. त्यानंतर आपल्या अर्जात बदल अथवा सुधारणा करण्यासाठी १० ते १२ नोव्हेंबर या काळात संधी देण्यात येईल.