मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘झी टॉकीज’चा मानाचा मुजरा | Veteran actor Ashok Saraf honored by Zee Talkies mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘झी टॉकीज’चा मानाचा मुजरा

मराठी चित्रपटसृष्टीत विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकतेच ‘झी टॉकीज कॉमेडी पुरस्कार २०२२’च्या मंचावर विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘झी टॉकीज’चा मानाचा मुजरा
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘झी टॉकीज’चा मानाचा मुजरा

मराठी चित्रपटसृष्टीत विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकतेच ‘झी टॉकीज कॉमेडी पुरस्कार २०२२’च्या मंचावर विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार प्रदान करताना संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेले होते.चित्रपटसृष्टीतील कलाकारांपासून राजकीय नेत्यांपर्यंत अशोक सराफ यांच्या अभिनयाचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. अशोक सराफ यांच्या वयाची पंच्याहत्तरी आणि अभिनय कारकीर्दीची पन्नाशी या दुग्धशर्करा योगाचे औचित्य साधत यंदाचा झी टॉकीज कॉमेडी पुरस्कार सोहळ्यात हा क्षण खास थाटामाटात साजरा करण्यात आला.

हेही वाचा >>>बनावट छायाचित्र तयार करून खंडणीची मागणी; खार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

विनोदाच्या टायमिंगचा बादशाह
अशोक सराफ यांच्याकडे अभिनयाची ताकद आणि विनोदाच्या टायमिंगची किल्लीच होती. ‘पांडू हवालदार’, ‘धूमधडाका’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘गंमत जम्मत’, ‘वजीर’, ‘चौकट राजा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये कधी विनोदी, तर कधी गंभीर अशा भूमिका त्यांनी उत्तम वठवल्या.

हेही वाचा >>>बेस्टच्या नोटीसवर कंत्राटदाराचे मौन; मिनी बसची संख्या रोडावली

अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेल्या अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील एक पर्व गाजवले आहे. सहजसुंदर अभिनय आणि विनोदाची नस अचूक माहीत असलेले अशोक सराफ म्हणजे विनोदी अभिनयाचे विद्यापीठ आहे. त्यांच्या संवादशैलीने गेली ५० वर्षे प्रेक्षकांच्या मनावर गारूड केले आहे. झी टॉकीज कॉमेडी पुरस्कार सोहळ्यात विनोदी चित्रपट आणि नाटक या क्षेत्रातील उत्कृष्ट कलाकृतींचा गौरव होत असताना अशोक सराफ यांचा सन्मान होणे म्हणजे रसिक प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणीच.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“उद्या तो नगरसेवक झाला तर त्याच्या…”; शिंदेंच्या दीड वर्षाच्या नातवावरुन टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना नारायण राणेंचा टोला

संबंधित बातम्या

“सतत एकेरी उल्लेख करतोय कारण…” विक्रम गोखलेंच्या निधनानंतर शरद पोंक्षे यांचं ट्वीट चर्चेत
“मुलींना मेसेज करता तेव्हा त्यांचे कपडे…” चेतन भगत यांच्या वक्तव्यानंतर उर्फी जावेद संतापली
“एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण
जितेंद्र जोशीची विक्रम गोखलेंबद्दल भावूक पोस्ट; म्हणाला, “काका तू कायम राहणार आहेस…”
“तिचे फोटो लोक रात्री बिछान्यात…” चेतन भगत यांचं उर्फी जावेदबाबत गंभीर वक्तव्य

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“मुलींना मेसेज करता तेव्हा त्यांचे कपडे…” चेतन भगत यांच्या वक्तव्यानंतर उर्फी जावेद संतापली
FIFA World Cup 2022: ‘एमबाप्पे हा एक उत्कृष्ट खेळाडू’, प्रशिक्षक डेशॅम्प्स यांनी डेन्मार्कच्या सामन्यानंतर केला कौतुकाचा वर्षाव
‘सरकारला साहित्यिकांची भीती म्हणूनच त्यांनी द्वादशीवारांना डावलले’; प्रभा गणोरकर यांची साहित्य क्षेत्रातील सरकारी हस्तक्षेपावरुन टीका
प्रेमभंग झाल्यानंतरचा अनुभव शेअर करताना नोरा फतेहीला अश्रू अनावर; म्हणाली, “त्यावेळी मी…”
“मी कुठेतरी वाचलंय, रेडा हे…”, उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “पाच महिन्यांपूर्वी आम्ही वाघ होतो!”