फिजिओथेरापीस्ट तरुणीकडे काही दिवस उपचार घेतल्यानंतर तिच्या प्रेमात पडलेल्या युवकाने तिच्याशी अश्लील चाळे केले. या प्रकरणी तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रशांत सत्यनारायण तिवारी (३३, सूर्यनगर, कळमना) असे आरोपीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- चंद्रपूर : बिबट घरात घुसला अन् कुटुंबीयांचा…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२२ मध्ये आरोपी प्रशांत तिवारी याचा अपघात झाला होता. तो एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. तेथे २५ वर्षीय फिजिओथेरापीस्टशी त्याची ओळख झाली. तिच्याकडून तो रोज उपचार करून घेत होता. वारंवार संपर्कात असल्यामुळे प्रशांतचा तिच्यावर जीव जडला. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागला. दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले. प्रशांत तंदुरुस्त झाल्यानंतरही तिच्या संपर्कात होता. तिला फोन आणि संदेश पाठवत होता. त्यानंतर त्याने गेल्या १४ फ्रेब्रुवारीला तिला ‘प्रपोज’ केले. मात्र, तिने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे तो तिच्यावर चिडून होता.

हेही वाचा- नागपूर : गडकरींच्या शहरातील रस्त्यांवर खड्डे; आम आदमी पार्टीचे आंदोलन

त्याने तिचा पाठलाग करणे सुरु केले. त्यामुळे तिने आईवडिलांना हा प्रकार सांगितला. तिच्या वडिलाने प्रशांतला घरी बोलावले. त्याची समजूत घातली. त्याने माफी मागून प्रकरण मिटवले. २४ फेब्रुवारीला रात्री साडेआठ वाजता प्रशांतने तरुणीचा पुन्हा पाठलाग केला. निकालस मंदिराजवळ तिला अडविले. तिला प्रेमाची मागणी घातली. तिने नकार देताच प्रशांतने तिच्याशी अश्लील चाळे करून पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against a young man who molested a young physiotherapist in nagpur adk 83 dpj