लोकसत्ता टीम
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
भंडारा: सध्या शहरात चोरांची एक टोळी सक्रिय झाली आहे. चादर विक्री करण्याच्या निमित्ताने ते घरोघरी जाऊन पाळत ठेवतात आणि संधी मिळताच चोरी करून पसार होतात. नागरिकांनी अशा बनावट चादर विक्री करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये तसेच संशयीतरित्या हालचाली करणाऱ्यांबाबत नजीकच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी किंवा ११२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी केले आहे.
काही दिवसांपासून चादर विक्रीच्या नावाखाली अज्ञात व्यक्ती गावात आणि शहरात घरोघरी जात आहेत. ते त्या घरावर पाळत ठेवतात आणि कालांतराने संधी साधून त्या घरी चोरी करतात.
First published on: 06-06-2023 at 14:02 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A gang of thieves is active in the name of selling sheets in bhandara ksn 82 dvr