गोंदिया जिल्ह्यात रानटी हत्तींचा कळप पुन्हा परतला; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण |A herd of wild elephants has returned to Gondia district | Loksatta

गोंदिया जिल्ह्यात रानटी हत्तींचा कळप पुन्हा परतला; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

गुरूवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमरपायली परिसरात हजेरी लावून हत्तींनी कापणी केलेल्या धानपिकांचे नुकसान केल्याने शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

A herd of wild elephants has returned to Gondia district
प्रातिनिधिक छायाचित्र

गोंदिया : गडचिरोली जिल्ह्यात गेलेल्या हत्तींच्या कळपाने पुन्हा गोंदिया जिल्ह्यात प्रवेश केला असून अर्जुनी मोरगांव तालुक्यातील उमरपायली परिसरातील धान पिकांचे मोठे नुकसान केले आहे. वन विभागाची चमू पुन्हा येथे दाखल झाला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेतून १३ ऑक्टोबरला हत्तींच्या कळपाने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव, नागणडोह, तिडका परिसरात प्रवेश करून चांगलाच धुमाकूळ घातला होता, त्यामुळे या परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यानंतर हा कळप गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात परत गेला होता. मात्र, काल गुरूवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमरपायली परिसरात हजेरी लावून कापणी केलेल्या धानपिकांचे नुकसान केल्याने शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील महिन्यात हत्तींच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागनडोह येथील वसाहतीत धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. त्यामुळे या वस्तीतील ३५ ते ४० नागरिकांना बोरटोला येथील शाळेत ठेवण्यात आले.

हेही वाचा : नागपूर: मुख्यमंत्र्यांना काळ्या कपड्यांची एलर्जी?; सभास्थळी महिलांच्या काळ्या ओढण्या काढून ठेवण्याचा विचित्र प्रकार

अनेक धान पिकाचे देखील नुकसान केले होते. कालांतराने हत्तींचा कळप गडचिरोलीत परत केल्याने वन विभाग निवांत झाले होते. मात्र, काल हत्तींचा कळप उमरपायली परिसरातून जांभळी, घोगरा, गंधारी व नागणडोहकडे गेल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-11-2022 at 15:24 IST
Next Story
नागपूर: मुख्यमंत्र्यांना काळ्या कपड्यांची एलर्जी?; सभास्थळी महिलांच्या काळ्या ओढण्या काढून ठेवण्याचा विचित्र प्रकार