मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्यात प्रथमच आगमन होत असल्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. जाहीर सभेच्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना काळ्या कपड्यांची एलर्जी आहे की काय? अशी चर्चा सभास्थळी रंगली आहे. सभेला आलेल्या महिलांच्या अंगावरील काळ्या ओढण्या जमा करून त्या एका कोपऱ्यात ठेवण्यात आल्याचा विचित्र प्रकार दिसून आला.

हेही वाचा- चित्रा वाघ यांच्या शनिवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांचा बहिष्कार

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
ganesh naik, sanjeev naik, thane, lok sabha election 2024, shiv sena, shinde group, sanjeev naik
ठाण्यासाठी नाईक नकोतच, शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

शहरातील खात रोड येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. याकरिता गर्दी दाखविण्यासाठी मोठ्या प्रमाणात शहराच्या कानाकोपऱ्यातून आणि बाहेर गावाहून मोटारीने नागरिकांना जमा करून आणण्यात आले. महिलांना २०० रू . रोजंदारीने गर्दी दाखविण्यासाठी आणण्यात आल्याचे काही महिलांनी सांगितले. यात विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या स्वागत सोहळ्यात बाधा होऊ नये किंवा कुणीही काळे झेंडे दाखवून नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र काळ्या झेंड्यासोबत मुख्यमत्र्यांना काळ्या कपड्यांची एलर्जी आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण, महिलांच्या अंगावरील काळ्या ओढणी काढून जमा केल्या जात आहेत.