नागपूर :उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपीला नागपुरातून अटक

भारतीय जनता पक्षाच्या माजी वादग्रस्त प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे अमरावतीमधील औषध विक्रेता उमेश कोल्हे हे समर्थक होते.

arrest
सांकेतिक फोटो

अमरावतीमधील बहुचर्चित उमेश कोल्हे हत्याकांडातील फरार आरोपी शेख इरफान शेख रहिम (३२, कमेला ग्राऊंड, अमरावती) याला अमरावती पोलिसांनी नागपुरातून अटक केली.

भारतीय जनता पक्षाच्या माजी वादग्रस्त प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे अमरावतीमधील औषध विक्रेता उमेश कोल्हे हे समर्थक होते. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर कोल्हे यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांची २१ जूनला दुचाकीने आलेल्या आरोपींनी चाकूने भोसकून हत्या केली. या प्रकरणी अमरावती पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली होती. सातवा आरोपी शेख इरफान हा फरार होता. तो शहर सोडून दुसऱ्या शहरात गेल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली. इरफान हा नागपुरात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळताच आज नागपुरात पोलिसांनी सापळा रचला व मोठ्या शिताफीने इरफानला अटक केली. त्याला सायंकाळी अमरावतीला नेण्यात आले.

शेख इरफान हा स्वयंसेवी संस्था चालवित होता. मुख्य आरोपी शमीम आणि त्याच्या मित्रांना इरफाननेच प्रोत्साहन दिले होते. आरोपींना काही रुपये आणि कार उपलब्ध करण्याची मदत करण्याचे आश्वासन दिले होते. कोल्हे हत्याकांडाचा तपास करण्यासाठी एनआयएचे पथक अमरावतीत दाखल झाले असून नुपूर शर्मा यांचे समर्थक असल्यामुळेच कोल्हे यांचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accused in umesh kolhe murder arrested from nagpur amy

Next Story
नागपूर : ऑनलाईन वीज बिल भरले, बँक खाते रिकामे झाले ; सायबर गुन्हेगारांचा महावितरणच्या नावाने ‘ट्रॅप’
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी