नागपूर: नवरात्र, धम्मचक्र प्रवर्तन दिनी अधिकृत वीज जोडणी न घेणाऱ्या मंडळांवर महावितरण कारवाई करणार आहे. या कार्यक्रमात वीज अपघात टाळण्यासाठी अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आ‌वाहन महावितरणने केले आहे. उपराजधानीत मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक मंडळांकडून नवरात्रातील रोषणाई, देखावे, मंडप, गरबा महाप्रसाद, रावण दहन तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त्तने विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यात मोठ्या प्रमाणावर रोषणाई, भोजनदान व इतर कार्यक्रमही घेतले जातात. त्यासाठी वीज जोडणी आवश्यक आहे.

परंतु काही मंडळे अनधिकृत वीज जोडणी घेतात. त्यामुळे वीजेचे अपघातही संभावतात. हा धोका टाळण्यासाठी अधिकृत जोडणी घेऊन सुरक्षेचे उपाय नागरिकांचा जीव वाचवू शकतो. त्यामुळे महावितरणने ही वीजव्यवस्था अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच घेण्याचे आवाहन मंडळांना केले आहे. दरम्यान तातडीच्या मदतीसाठी २४ तास सुरू असणारे निशुल्क मदत क्रमांक १९१२, १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या भ्रमनध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आ‌वाहनही महावितरणने केले आहे.