आमा आदमी पक्षाक्षाने नागरी सुविधांच्या प्रश्नावर आंदोलन करून महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. नागपूर हे केद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे गृहशहर आहे. संपूर्ण देशात ज्याप्रमाणे गडकरी यांनी रस्ते बांधले तसेच नागपुरातही त्यांनी सिमेंटचे रस्ते बांधले. डांबरी रस्ते ही केले. पण रस्त्याच्या दर्जा बाबत पूर्वी शंका होत्या आणि आजही आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा- वर्धा : पक्षसभेला भाजपा नेत्यांची दांडी; स्पष्टीकरण मागणार
पश्चिम नागपुरातील किंग्जवे हाॅस्पिटल व एलआयसी चौक परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वारंवार तक्रारी करुनही प्रशासन या विषयाकडे गांभिर्याने लक्ष देत नाही. रविवारी आम आदमी पार्टी पश्चिम नागपूरच्या कार्यकर्त्यांनी या खड्ड्यांसमोर लक्षवेधी आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
First published on: 26-02-2023 at 13:26 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation by aam aadmi party west nagpur workers against road potholes in nagpur cwb 76 dpj