अयोध्येत राम मंदिर निर्माणाचं काम वेगाने सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे मंदिर २०२४ पर्यंत बांधून पूर्ण होईल असं वक्तव्यही केलं. मात्र, आता आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी याच अयोध्येतील राम मंदिराबाबत मोठं विधान केलं आहे. “लोकसंख्येचं असंतुलन रोखलं नाही, तर ५० वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराला धोका असेल,” असा इशारा तोगडीयांनी दिला. ते सोमवारी (६ फेब्रुवारी) नागपूरमध्ये बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रविण तोगडिया म्हणाले, “आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेला वाटतं की, देशात राम मंदिर निर्माण होत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, जर लोकसंख्येचं असंतुलन रोखलं नाही, तर ५० वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराला धोका असेल. त्यामुळे केंद्र सरकारने ही लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा तात्काळ तयार करावा.”

“मोदी शाहांनी सरकारच्या अखेरच्या वर्षात लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा”

“नरेंद्र मोदी आणि अमित शाह भाजपाच्या बहुमताच्या सरकारचं नेतृत्व करत आहेत. त्यांच्या सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे. त्यांनी सरकारच्या या अखेरच्या वर्षात लोकसंख्या नियंत्रणाचा कायदाही तयार करावा. तसेच काशी आणि मथुरा मंदिर तयार करण्यासाठी आणि लव्ह जिहाद विरोधी कायदाही तयार करावा,” अशी मागणी प्रविण तोगडीया यांनी केली.

हेही वाचा : विश्लेषण: अयोध्येत आले १४० दशलक्ष वर्ष जुने शाळीग्राम; राम-जानकीच्या मूर्तींसाठी याच शिला का निवडल्या?

“राम मंदिर २५ पीढ्यांच्या बलिदानानंतर निर्माण होत आहे”

“राम मंदिर ४५० वर्षे म्हणजे २५ पीढ्यांच्या बलिदानानंतर निर्माण होत आहे. या सरकारने काशी-मथुरा मंदिर निर्माणासाठी आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा केला तर त्यांना नक्की यश मिळेल,” असंही तोगडीयांनी नमूद केलं.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ahp chief pravin togdiya warn narendra modi amit shah about ram temple in ayodhya rno news pbs