नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरात रस्ते, भुयारी मार्ग, उड्डाणूल बांधण्याचा धडका लावला आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यत रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, बोगदे उभारण्यात येत आहेत. नागपुरातही मोठ्या संख्येने उड्डाणपूल, भुयारी मार्गाचे काम सुरू आहेत.अमरावती मार्गावरील आरटीओ ते नागपूर विद्यापीठ परिसरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे अखेर काम पूर्ण झाले आहे. त्यास तब्बल एक वर्षांचा विलंब झाला आहे.

या उड्डापुलाचे काम ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. या उड्डाणपुलाचे लोकार्पण ३१ ऑगस्टला होणार आहे. मात्र, उड्डाणपुलाखालील मार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे खालचा रस्ता वाहतुसाठी खुला होण्यास प्रतिक्षा करावी लागणार आहे.अमरावती महामार्गावरील ब्लँक स्पॉट संपवणे आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मे २०२१ मध्ये दोन उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्यातील वाडी पोलिस स्टेशन ते गुरुद्वारा (१.९५ किमी) उड्डाणपूल सुरू झाला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ते नागपूर विद्यापीठ कॅम्पसपर्यंतच्या (२.८५ किमी) काम अंतिम टप्प्यात आले आहे. ३१ ऑगस्टपूर्वी हा उड्डाणपूल सुरू होणार आहे.

गडकरी यांच्या पुढाकाराने प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून तर वाडी पोलिस ठाण्यापर्यंतच्या ५ कि.मी. अंतरावर दोन उड्डाणपूल बांधण्यास प्रारंभ झाला. अमरावती महामार्गावरील वाडी नाका ते वाडी पोलिस ठाण्यापर्यंतच्या सुमारे अडीच किमीचा उड्डाणपूल सुरू झाला. अमरावती महामार्गावरील उड्डाणपूल प्रकल्पात, फुटाळा तलाव चौक, विद्यापीठ कॅम्पस ते आरटीओ पर्यंतच्या पुलाचे काम रेंगाळले आहे. आरटीओ कार्यालयासमोरील जुन्या नाल्यावर पूल बांधण्याचे काम केले जात आहे. याशिवाय आरटीओ ते बोले पेट्रोल पंपपर्यंत काँक्रिट रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.

पहिल्या टप्प्यात प्रादेशिक परिवहन कार्यालय ते विद्यापीठ कॅम्पसपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. मात्र अनेक अडचणीमुळे हा मार्ग तयार करण्यासाठी विलंब झाला आहे. सध्या नाल्याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी जुलै २०२५ पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. एकूण ४७८ कोटींच्या दोन उड्डाणपुलाला अतिरिक्त कालावधी लागल्याने प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. आरटीओ कार्यालय ते रवीनगर चौकापर्यंतची झाडे तोडण्याची परवानगी उशिरा मिळाल्याने उड्डाणपुलाच्या बांधकामाला उशीर झाला होता, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हा उड्डाण पूल बोले पेट्रोल पम्पपासून सुरू होते आणि नागपूर विद्यापीठाच्या चौकात उतरते. पुलाखालील रस्ता सिमेंट कॉक्रीटचा करण्यातयेत आहे. काही ठिकाणीते काम पूर्ण झाले तर अजून काही काम शिल्लक आहे. उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आरटीओ चौक आणि आसपासच्या परिसरात होणारी वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.