लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला: जिल्ह्यातील लोतखेड येथे माजी सैनिकाने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची घटना १८ एप्रिलला रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.

अकोट तालुक्यातील लोतखेड येथे एका भूखंडाच्या वादावरून गोळीबार हत्याकांड घडले. अनेक वर्षांपासून हा जुना वाद सुरूच होता. मंगळवारी रात्री पुन्हा वाद झाला. या वादातून माजी सैनिक कदीर शाह याने फिरोज पठाण यांच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये फिरोज पठाण गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हेही वाचा… भंडारा : लग्न सोहळा आटोपून येणाऱ्या वाहनाला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, सहा जखमी

घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. फिरोज पठाण हे ऑटो चालक असून, ते गावातील उर्दू शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष होते. या प्रकरणी तपास सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An ex soldier fired at one man over a land dispute in akola ppd 88 dvr