नागपूर: लग्नाचा हंगाम सुरू असतांनाच नागपुरात सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे. नागपूर सराफा बाजाराच्या दरानुसार नागपुरात शुक्रवारी (२२ डिसेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर तब्बल ६३ हजार रुपये प्रति दहा ग्राम नोंदवले गेले. गेल्या आठवड्याभराचा अभ्यास केल्यास हे दर सर्वाधिक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूरसह राज्याच्या इतरही भागात हल्ली लग्नाचा हंगाम सुरू आहे. मोठ्या संख्येने लग्नासह स्वागत समारंभ आणि इतरही कार्यक्रमची रेलचेल आहे. मोठ्या प्रमाणात सोने- चांदिच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. परंतु या हंगामात दर वाढल्याने लग्न असलेल्या घरात सोने खरेदीने चिंता वाढली आहे. नागपूर सराफा बाजारातील दरानुसार २२ डिसेंबर २०२३ रोजी नागपुरात २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम सोन्याचे दर ६३ हजार रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ४०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४१ हजार रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७५ हजार ६०० रुपये होता.

हेही वाचा… अनेकांचे संसार उद्ध्वस्त, तरीही अवैध दारु विक्रेते मोकाटच…

हे दर १५ डिसेंबर २०२३ रोजी नागपुरात २४ कॅरेटसाठी ६२ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ८०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७५ हजार रुपये होता. रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी हे दर आणखी वाढण्याचे संकेत दिले आहे.

६२,२०० रुपयांपर्यंत आले होते दर

नागपुरात १६ डिसेंबर ते १८ डिसेंबरदरम्यान २४ कॅरेट सोन्याचे दर ६२ हजार २०० रुपयांपर्यंतआले होते. त्यानंतरही दर थोडेफार वाढले असले तरी ६३ हजार प्रति दहा ग्रामपर्यंत गेले नव्हते. परंतु शुक्रवारी हे दर वाढल्याने ते आता ६५ हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत जाण्याचा अंदाज सराफा व्यवसायिकांनी वर्तवला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As the wedding season begins the price of gold in nagpur has increased mnb 82 dvr