नागपूर : मेडिकल रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी शस्त्रक्रियेतून प्रसूती झालेल्या महिलेत गुंतागुंत झाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यात कमी वजनाच्या जन्मलेल्या बाळाचाही अतिदक्षता विभागात मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी गोंधळ घातले. वेळीच महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान तेथे पोहचल्याने तणाव निवळला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील शिवानी नेवारे या महिलेला ९ महिने पूर्ण होण्यापूर्वीच पोटात कळा आल्या. यामुळे मेडिकलमध्ये आणले. १२ ऑक्टोबरला शस्त्रक्रियेतून प्रसूती झाली. शिवानीची प्रकृती प्रसूतीनंतर खालावली होती. यामुळे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दरम्यान बाळ कमी वजनाचे असल्याने लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (वॉर्ड क्रमांक ५०) त्याच्यावर उपचार सुरु होते. रविवार १५ ऑक्टोबर रोजी शिवानीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १६ ऑक्टोबरला बाळही दगावले. ही तक्रार मंगळवारी पुढे आली.

हेही वाचा >>> डिझेलअभावी गडचिरोलीकडे जाणाऱ्या एसटी रद्द, नागपूरचे अधिकारी म्हणतात..

एकापाठोपाठ आई आणि मुलाचा मृत्यू झाला. दोघांचाही मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त झाले. यामुळे आठ ते दहा नातेवाईक बालरोग अतिदक्षता विभागात शिरले आणि गोंधळ घालण्यास सुरवात केली. सुरक्षा रक्षक त्यावेळी तैनात नव्हते. यामुळे त्यांना निवासी डॉक्टर व परिचारिकांनी रोखले. परंतु नातेवाइकांनी गोंधळ घालणे सुरुच ठेवले.  रुग्णांच्या नातेवाइकांनी मध्यस्थी केली. यामुळे मोठा अनर्थ टळला. मेडिकल प्रशासनाने तातडीने अतिदक्षता विभागाच्या बाहेर सुरक्षा रक्षकांना तैनात केले. या घटनेबाबत चौकशी समितीही नेमल्याची माहिती आहे.

प्रसुत माता दगावल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाळ दगावले. या बाबत नातेवाईकांना माहिती दिली, असता ते आलेच नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी हा दगावलेला बच्चू आमचा नाही, असे सांगत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची समजूत काढली गेली. – डॉ. मनिष तिवारी, विभाग प्रमुख, मेडिकल, बालरोग विभाग

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baby dies within 24 hours after mother confusion in medical department mnb 82 ysh