गडचिरोली : दिव्यांगांकडे मताच्या दृष्टीने नव्हे तर सेवा आणि कर्तव्य म्हणून बघितल्या जावे. संख्या कमी आहे म्हणून त्यांच्याकडे लक्ष देण्यास राजकारणी आजपर्यंत दुर्लक्ष करीत आले आहे. राज्यभरात सुरू असलेल्या ‘दिव्यांगाच्या दारी’ उपक्रमात सहभागी होण्यास नेते अनुत्सुक आहेत. किमान गडचिरोलीत तरी दोन आमदार उपस्थित आहेत, अशी खंत दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी गडचिरोली येथे व्यक्त केली. ते शहरातील संस्कृती सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
गडचिरोली येथे आयोजित ‘दिव्यांगांच्या दारी’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिव्यांग कल्याण
हेही वाचा – काय सांगता? चक्क वाघ आणि कासवात रंगलीय स्पर्धा! नेमका काय आहे प्रकार? जाणून घ्या…
सोबतच दिव्यांग कल्याण विभागासाठी तत्परतेने निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हेही वाचा – गोंदिया : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान विकासापासून वंचित; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
गडचिरोली जिल्हा आदर्श ठरावा
राज्यात गडचिरोली जिल्हा म्हटले की अधिकारी येण्यास तयार नसतात. दुर्गम आणि मागास म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. परंतु, दिव्यांगाच्या दारी हा उपक्रम अतिशय उत्तम पद्धतीने राबवून गडचिरोली जिल्हा इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरावा, अशा सूचना आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachu kadu said leaders are reluctant to participate in divyangachya dari initiative ssp 89 ssb